पाकच्या बलुची लोकांवरील अत्याचारांविषयी भारतातील पाकप्रेमी, निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड का उघडत नाहीत ?
नवी देहली : काश्मीरमधील सद्य:स्थितीवरून मानवी अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची पाकची ओरड हा निव्वळ ढोंगीपणा आहे. पाक निर्लज्ज आहे. पाकने मागील ७२ वर्षांपासून बलुचिस्तानवर अवैधरित्या नियंत्रण मिळवले, असा आरोप बलुच नॅशनल मुव्हमेंटचे प्रवक्ते हमाल हैदर यांनी केला आहे. पाकने कायद्यांचे उल्लंघन करून बलुचिस्तानचे समर्थन करणार्या बलुची नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ठार मारले आहे, असा आरोप हैदर यांनी केला आहे. १४ ऑगस्ट या पाकच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक बलुचिस्तान समर्थकांनी सामाजिक माध्यमांतून पाकिस्तानवर टीका केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात