धर्मांधांना काठीने मारल्याचा पोलिसांवर ठपका
पोलिसांनी धर्मांधांना रोखायचे नाही, तर मग काय दंगली होऊ द्यायच्या ? असे असेल, तर नेमका न्याय कुणाला मिळाला ?
हिंगोली : येथे हिंदूंनी काढलेल्या कावडयात्रेवर धर्मांधांनी १२ ऑगस्टला दगडफेक केली होती. या वेळी धर्मांधांना रोखणार्या ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. धर्मांधांनी घातलेल्या हैदोसामुळे हिंदू संतप्त झाले आहेतच; मात्र पोलिसांच्या निलंबनामुळे हिंदूंचा संताप अनावर झाला आहे. गणेश वाबळे, विलास शिनगारे आणि नितीन रामदिनवार अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. धर्मांधांना काठीने मारल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संतोष बांगर यांनी तिन्ही पोलीस कर्मचार्यांच्या पाठीशी उभे रहात हे अन्यायकारक निलंबन मागे घ्यावे, अशी लेखी मागणी केली आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला, त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अशोक घोरबांड यांना मात्र पोलीस निरीक्षक प्रकाश मुत्याल आणि पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी अभय दिले आहे. (एकमेकांना पाठीशी घालणार्या पोलिसांवरच बडतर्फीची कारवाई करायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
शिवसेनेच्या कावडयात्रेचे टी-शर्ट घातलेल्या हिंदूला ५० हून अधिक धर्मांधांकडून अमानुष मारहाण
एका वृत्तपत्राला धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीचा व्हिडिओ मिळाला. त्यात शिवसेनेच्या कावडयात्रेचे टी-शर्ट घातलेल्या एका हिंदु तरुणाला ५० हून अधिक धर्मांधांनी अमानुष मारहाण केल्याचे दिसत आहे. हिंदु तरुणाने तेथून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात