Menu Close

धर्मांधांनी अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीची काढलेली छेड हेच नंदुरबार दंगलीमागील कारण ?

वासनांधांपासून हिंदु मुलींचे रक्षण होण्यासाठी हिंदु राष्ट्र्र स्थापन करणे अपरिहार्य !

dharmandh1नंदुरबार : शहरातील माळीवाडा भागामध्ये एका किरकोळ कारणावरून हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये २२ मार्च या दिवशी दंगल झाली होती. या दंगलीमागे प्रथम हिंदु आणि मुसलमान विद्यार्थ्यांमध्ये नक्कल (कॉपी) करण्याप्रकरणी वादावादी झाली आणि त्याचे पर्यावसान दंगलीमध्ये झाले, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र धर्मांधांनी एका अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीची छेड काढल्यामुळे ही दंगल झाली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

१. २२ मार्च या दिवशी एक अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनी १० वीची परीक्षा देण्यासाठी परीक्षाकेंद्रावर जात होती. त्या वेळी २ धर्मांध युवकांनी त्या विद्यार्थिनीला परीक्षाकेंद्रावर जाण्यापासून अडवले. त्या वेळी त्या विद्यार्थिनीने त्या धर्मांधांना परीक्षेला जाऊ देण्यासाठी विनवणी केली.

२. त्या वेळी ते धर्मांध वेगवेगळ्या बाजूला जाऊन त्यांनी तिला जाण्यासाठी वाट करून दिली. ती पुढे जात असतांना त्या दोन्ही धर्मांधांनी तिला अचानकपणे दोन्ही बाजूने कचाट्यात पकडले. त्या वेळी त्या विद्यार्थिनीने निसटून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्या धर्मांधांनी तिची ओढणी खेचली.

३. एका हिंदु युवकाने हा सर्व प्रकार घडत असतांना पाहिला. त्याला चीड आल्यामुळे त्याने त्या धर्मांधांना जाब विचारला. त्या युवकाला दोन्ही धर्मांधांनी पुष्कळ मारहाण केली.

४. त्या विद्यार्थिनीने त्या धर्मांध युवकांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांना हा सर्व प्रकार सांगितला. ही युवती धर्मांधांच्या घरी जात असतांना धर्मांधांनी मशिदीतून दगडफेक चालू केली. (हिंदूंनो, धर्मांधांपासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *