Menu Close

मलकापूर येथे शाळांमध्ये निवेदन आणि प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम !

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमेच्या अंतर्गत १४ ऑगस्ट या दिवशी ग.रा. वारंगे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथील प्राचार्य श्री. जे.एस्. शेटे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रमेश पडवळ, रमेश कुंभार, विक्रांत मोरबाळे, सुहास पाटील, मयुर पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी शाळेत भित्तीपत्रकही लावण्यात आले. गर्ल्स हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. के.वी. पाटील यांच्या अनुमतीनंतर ४०० विद्यार्थी आणि शिक्षक यांना राष्ट्रध्वजाविषयी माहिती देण्यात आली.

‘नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये’, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले होते.

सोलापूर आणि लातूर येथील धर्मप्रेमींनी दिले निवेदन

लातूर : येथे उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांना, तसेच येथील राजस्थान विद्यालयासमवेत २५ महाविद्यालयांतील मुख्याध्यापकांना निवेदन दिले. या वेळी राष्ट्रप्रेमी श्री. रत्नदीप निगुडगे, अधिवक्ता गिरीधर बोटवे, श्री. विष्णु तिगिले, श्री. श्रीशैल स्वामी, श्री. प्रभाकर कोलपक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापूर : येथील एम्आयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर जिल्हाधिकारी अजित देशमुख, तसेच ४ शाळांमध्ये निवेदन देण्यात आले.

नगर येथे २ शाळांमध्ये लावलेल्या क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा देशाभिमान वाढला

नगर : येथील समर्थ विद्या मंदिर प्रशाला आणि महर्षि चितांबर विद्या मंदिर येथे क्रांतीकारकांच्या फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यात आले. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. ‘प्रदर्शनामुळे क्रांतीकारकांविषयी आदर निर्माण झाला, तसेच देशाभिमान वाढला’, असे मुलांनी सांगितले. शिक्षकांनी उपक्रमाचे कौतुक करत देशप्रेम वाढवणारे उपक्रम घेण्याविषयी सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *