Menu Close

गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा यावल (जळगाव) येथील सार्वजनिक मंडळांचा निर्धार

बैठकीला उपस्थित गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते

यावल : गवत बाजार येथील सार्वजनिक वाचनालयात (लायब्ररी) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १६ मंडळांचे पदाधिकारी, मान्यवर, धर्मप्रेमी असे ६० हून अधिक जण उपस्थित होते.

शंखनाद करून बैठकीस आरंभ झाला. सौ. नीलिमा नेवे यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू सांगितला. यानंतर ‘गणेशोत्सव वास्तव आणि आदर्श’ ही ध्वनिचित्रफीत सर्वांना दाखवण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘गणेशोत्सवाचे वास्तविक स्वरूप आणि जागृती करण्याची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी ‘सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे जागृती करू शकतो ?’ याविषयी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी अनेक मंडळांनी आपल्या मंडळात प्रबोधनपर फलक लावण्याचा निश्‍चय केला. काही मंडळांनी प्रवचनाचे आयोजन करण्याचे निश्‍चित केले आहे. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमाच्या वेळी विद्युत्प्रवाह खंडित होऊनही सर्वजण स्थिर होते. त्यामुळे कार्यक्रम अखंड चालूच होता.

२. या कार्यक्रमाला सर्व वयोगटातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *