वर्धा : प्लास्टिकचे राष्ट्रध्वज खरेदी करू नयेत, राष्ट्रध्वज हा उंच ठिकाणीच फडकवायला हवा यांविषयी प्रबोधन करण्यासाठी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्य लोकांना समजावे म्हणून आर्वी नाका, वर्धा येथे, नंदोरी चौक, हिंगणघाट येथे आणि बस स्टॅण्ड सिंदी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन कक्ष उभारण्यात आले होते. या प्रबोधनकक्षांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१. हिंगणघाट येथे स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील राष्ट्रप्रेमींनी प्रबोधन कक्षावर उपस्थित राहून लोकांचे प्रबोधन केले. राष्ट्रप्रेमी सर्वश्री कपिल झाडे, हेमंत शर्मा, सचिन पाटील, महेंद्र चाफले, मनोज वाघमारे, नीलेश शेंडे, सचिन मानकर, राहुल चिंचोळकर, सौ. स्वाती पाटील यांनी प्रबोधनकक्षाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत विषय पोचवण्यासाठी प्रयत्न केले.
२. आर्वी नाका येथील चौकामध्ये ‘आनंद डेअरी’च्या वतीने शाळेतील लहान मुलांना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने खाऊ आणि शालोपयोगी (स्टेशनरी) साहित्य देण्यात आले. येथे राष्ट्रध्वज उंचावर फडकावण्यात आला. तसेच समितीने केलेल्या प्रबोधनानंतर संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यात आले. येथे ‘राष्ट्रध्वजाचा मान कसा राखायचा ?’ याविषयी प्रबोधन करण्यात आले.
३. ‘वर्धा तालुका माजी सैनिक पतसंस्था मर्या.’च्या वतीने प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. तसेच वीरमरण आलेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. येथे समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. समितीचे श्री. हितेश निखार आणि सौ. भक्ती चौधरी यांनी समितीचे राष्ट्राविषयीचे कार्य, तसेच
५ कडव्यांचे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचे महत्त्व सांगितले. या वेळी २०० हून अधिक माजी सैनिक उपस्थित होते. या वेळी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यात आले. सर्वांनी ‘वन्दे मातरम्’ च्या घोषणा दिल्या.
नागरिकांच्या प्रतिक्रिया
१. हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आज मी सुद्धा राष्ट्रध्वजाचा स्वाभिमान बाळगतो. – श्री. रवि कन्नाके, वर्धा
२. ही सर्व माहिती समाजातील लोकांपर्यंत पोचली पाहिजे. – श्री. प्रशांत घंगारे, सिंदी