ठाणे : जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली. १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासंदर्भात शाळा, महाविद्यालय, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनाही निवेदन देण्यात आले.
डोंबिवली येथील तोंडवळकर शाळा, सरस्वती शाळा, गांधी विद्यामंदिर आदी ठिकाणी मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले. राबोडी पोलीस ठाणे येथे वरिष्ठ अधिकारी तसेच मानपाडा पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.