पुणे : धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून खडकवासला जलाशयात उतरल्याने होणारे पाण्याचे प्रदूषण रोखले जावे, या उद्देशाने राबवण्यात आलेली खडकवासला जलाशय रक्षण मोहीम संपूर्ण यशस्वी झाली. रंगपंचमीच्या दिवशी (२८ मार्च) सायंकाळी ६ वाजता या मोहिमेची यशस्वी सांगता करण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी जलाशयाभोवती मानवी साखळी करून उभे होते. ‘नको प्रदूषित पाणी, नको धर्महानी, सण साजरा करूया आनंद घेऊनी’, ‘जर आज केली जलाशयाची हानी, उद्या पत्करावी लागेल आणीबाणी’, ‘स्वच्छ आणि निर्मळ पाणी म्हणजे जीवन’ अशा प्रबोधनात्मक घोषणा असलेले फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्मळ पाण्याचे महत्त्व ओळखून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेली १४ वर्षे या मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. कमिन्स इंडियाही गेल्या ३ वर्षांपासून या मोहिमेत सहभागी होत आहे. पाटबंधारे विभाग, पोलीस-प्रशासन, ग्रामस्थ यांच्यासह शिवणे येथील पूनमचंद ट्रेडिंग कोर्पोरेशनचे श्री. विक्रम डांगे आणि कोथरूड येथील आशीर्वाद मंगल कार्यालयाचे श्री. अतुल जोशी, ‘जस्ट फँक्री’ या उपाहारगृहाचे मालक श्री. मनोज पाटील यांचेही या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले. अनेक जणांनी जलाशयाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या समितीच्या कक्षाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. समितीचा कक्ष पाहून त्या ठिकाणी आलेले श्री. बाळासाहेब मोरे यांनीही जलविषयक जागृतीचे विशेष कौतुक करून अधिक व्यापक प्रमाणात याचा प्रसार व्हायला हवा, असे विचार व्यक्त केले.
विनाकारण वाद उकरून काढणार्या धर्मांध कुटुंबाला रोखण्यासाठी पोलिसांना करावे लागले पाचारण !
धूलिवंदनच्या दिवशी खडकवासला जलाशयाभोवती कडे करून थांबलेले असतांना एक मुसलमान कुटुंब त्या ठिकाणी आले. समितीच्या एका महिला कार्यकर्त्याने त्यांना त्या दिवशी त्या ठिकाणी थांबण्यास प्रतिबंध असल्याचे सांगितल्यावर त्यांनी हुज्जत घालत ‘पाण्याकडे पाहिल्याने ते अल्प होणार आहे का ? एवढेच असेल तर तुमची होळीच बंद करा’, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ते तेथून जाण्यास सिद्ध नसल्याने अखेर पोलिसांना पाचारण करून त्यांना घालवावे लागले. (वादासाठी वाद उकरून काढणारेे धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात