भांडुप (मुंबई) : येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे आणि राष्ट्रीय प्रतिकांविषयी जागृती निर्माण करणे यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली. येथील श्रीमती रामकली देवी सनमान सिंह कनिष्ठ महाविद्यालय, बॅरिस्टर नाथ पै कनिष्ठ महाविद्यालय, सह्याद्री विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय, पराग विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच कांजूरमार्ग पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. दैनिक सनातन प्रभातचे वाचक या मोहिमेत सहभागी झाले होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. १५ ऑगस्टला आपणच येऊन याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, अशी मागणी बॅरिस्टर नाथ पै कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राघू बापू घनवट यांनी केली.
२. सह्याद्री विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणाले की, ‘राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा’ याविषयी आम्ही आधीच सूचना दिलेल्या आहेत.