बेंगळूरू : १५ ऑगस्ट या रक्षाबंधनाच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा असणार्या रणरागिणी शाखेच्या कार्यकर्तींकडून विविध मान्यवरांना राख्या बांधण्यात आल्या.
बेंगळूरूचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांना सौ. भव्या गौडा यांनी राखी बांधली. या वेळी पूर्णिमा प्रभु याही उपस्थित होत्या. शहरातील उद्योगपती, धर्माभिमानी, अधिवक्ता, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, नगरसेवक, आमदार, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हितचिंतक, सनातन प्रभातचे वाचक यांनाही रणरागिणी शाखेच्या महिला कार्यकर्त्यांकडून राखी बांधण्यात आली. या वेळी या सर्वांना हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.