Menu Close

हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्या) स्थापनेसाठी देशभरात २३८ ठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियान !

साधक, वाचक, हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी आणि रामभक्त मिळून ६ सहस्र ३०० जणांचा सहभाग !

आपल्या देशात आदर्श राज्य म्हणून रामराज्याचे उदाहरण दिले जाते. या दष्टीने सद्य:स्थितीत मात्र समाजात भ्रष्टाचार, अनाचार आदी समस्यांमुळे सामान्य व्यक्तीचे जीवन असह्य झाले आहे. त्यामुळेच रामराज्याच्या म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने वाटचाल होणे आवश्यक झाले आहे. या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि वातावरणातील रज-तम नष्ट व्हावे, यांसाठी भारतभरात ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियान करण्यात आले. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी हे अभियान राबवले. या अभियानाच्या अंतर्गत २६ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत देशभरात एकूण २३८ ठिकाणी अभियान झाले. या अभियानामध्ये साधक, वाचक, हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी आणि रामभक्त मिळून ६ सहस्र ३०० जणांनी सहभाग घेतला.

या अभियानात सहभागी झालेल्या हिंदूंना रामनाम घेतांना श्रीरामाचे अस्तित्व जाणवले, तसेच विविध अनुभूतीही आल्या.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *