‘वैगई पेरुविझा २०१९’
मदुराई (तमिळनाडू) : ‘अखिल भारतीय सन्यासी संगम’च्या वतीने मदुराई येथे २४ जुलै ते ४ ऑगस्ट २०१९ या कालावधीत ‘वैगई पेरुविझा २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला परिषद घेण्यात आली.
अखिल भारतीय संन्यासी संगमचे सचिव पू. रामानंदस्वामी यांनी या परिषदेत ‘अध्यात्मात महिलांच्या भूमिकेचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांविषयी महिलांचे कर्तव्य अन भूमिका, तसेच कुटुंबाप्रती महिलांचे कर्तव्य’ यांविषयी मार्गदर्शन केले. या व्याख्यानाला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
क्षणचित्रे
१. शारदापिठाच्या माताजींनी त्यांच्या महिला महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना व्याख्यान घेण्याची विनंती केली.
२. कार्यक्रमस्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनचे ग्रंथ, तसेच धर्मशिक्षणाविषयी माहिती देणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
३. मदुराईजवळील बैरागी मठाच्या एका माताजींनी सनातनचे तमिळ ग्रंथ स्वत:साठी खरेदी केले, तसेच त्यांनी ग्रंथ खरेदी करण्यासाठी इतरांनाही उद्युक्त केले.
४. अखिल भारतीय संन्यासी संगमचे सचिव पू. रामानंदस्वामी आणि पू. शेंदालंकारन् जीयार स्वामी यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि समितीच्या पुढील सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.