फलटण (जिल्हा सातारा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
आंदोलनाच्या अंतर्गत उपविभागीय अधिकार्यांना निवेदन
फलटण (जिल्हा सातारा) : भारतमातेच्या जयघोषाच्या संदर्भात एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्याच पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी देशद्रोही वक्तव्य केले होते; मात्र केवळ पठाण यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली. त्याप्रमाणे ओवैसी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी येथे २३ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगरपालिका चौकात आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाला फलटण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे श्री. रोहित राऊत, मिरगावचे ह.भ.प. जालिंदर महाराज वाघमोडे, मुधोजी हायस्कूल फलटणचे माजी प्राचार्य श्री. रवींद्र येवले, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. अलका व्हनमारे यांसह अनेकांनी निषेध व्यक्त केला. या वेळी अमोल सस्ते, आशिष कापसे, अभिजित कापसे, उदय ओझर्डे, प्रदीप जाधव यांसह ५० जण उपस्थित होते.
आंदोलनानंतर पंतप्रधानांच्या नावे फलटणचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार श्री. प्रकाश कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात