Menu Close

ठाणे येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अधिवेशन’

आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा गणेशोत्सव मंडळांचा निर्धार !

ठाणे : गणेशोत्सवाचे स्वरूप दिवसेंदिवस पालटत चालले असून त्यामुळे उत्सवाचे पावित्र्य न्यून होत आहे. तसेच धर्माची हानी होऊन समाजात चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे आपण आदर्श गणेशोत्सव साजरा करून समाजात आदर्श निर्माण करत श्री गणेशाची कृपा संपादन करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. त्यांच्या विचारांना उपस्थित मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार आणि पदाधिकारी यांनी सहमती दर्शवली आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला.

ठाण्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी येथील गावदेवी मैदानाजवळील स्काऊट गाईड सभागृहात सायंकाळी ५ वाजता ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिव प्रेरणा मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, एकलव्य मित्र मंडळ, श्री अष्टविनायक मित्र मंडळ इत्यादी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. सतीश कोचरेकर या वेळी म्हणाले की, गणेशोत्सव मंडळात जागरणासाठी जुगार खेळणे, चित्रपटांच्या गाण्यांवर नाचाच्या स्पर्धा घेणे, कर्कश आवाजात आरती म्हणणे, मिरवणुकीत डीजेच्या तालावर अंगविक्षेप करत नाचणे इत्यादी अपप्रकार घडतात. या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी उपाययोजना म्हणून आपण मंडळात धर्मशिक्षण देणारे फलक लावावेत. तसेच ध्वनीक्षेपकावर श्री गणेशाचा नामजप लावून ठेवावा. आरती सुरात म्हणावी. गणपतिविषयक शास्त्रीय माहिती सांगणार्‍या प्रवचनाचे आयोजन करावे. क्रांतीकारकांची माहिती द्यावी. श्री गणेशाची मिरवणूक टाळ वाजवत आदर्श पद्धतीने काढावी. अशा पद्धतीने कृती करून आपण श्री गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *