Menu Close

चिनी राख्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे तेलंगणमधील सिकंदराबाद आणि इंदूर येथे आंदोलन !

सिकंदराबाद येथे आंदोलन करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

भाग्यनगर : शत्रूराष्ट्र असलेल्या चीनच्या राख्यांचा बहिष्कार करण्याविषयी जनमानसांत जागृती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगणची राजधानी भाग्यनगरच्या शेजारील सिकंदराबाद या शहरात, तसेच इंदूर (निजामाबाद) येथे नुकतेच आंदोलन करण्यात आले. सिकंदराबाद रेल्वे स्थानक आणि बस स्थानक असलेल्या परिसरात निदर्शने करण्यात आली, तर इंदूरमधील मुख्य बाजारामध्ये चिनी राख्यांच्या विरोधातील फलक हातात पकडून फेरी काढण्यात आली. या चळवळीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाग्यनगर येथील आंदोलनाला संबोधित करतांना समितीचे तेलंगण समन्वयक श्री. चेतन गाडी म्हणाले, ‘‘चीनने भारताचा काही भाग गिळंकृत केला आहे, तसेच चीनने नेहमीच पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांना पाठिंबा दिला आहे. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही सीमेवर लढू शकणार नाही; पण आम्ही चीनने निर्माण केलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकून त्याला निश्‍चित धडा शिकवू शकतो.’’

क्षणचित्र : निदर्शने करतांना आणि फेरीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘बॉयकॉट चायनीज राखी !’ (चिनी राख्यांवर बहिष्कार टाका !) अशा प्रकारचे प्रबोधनात्मक फलक पकडले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *