कुडाळ येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी बालसाधकांचे पथनाट्य शहरात विविध ठिकाणी सादर करण्यात येत होते.
कुडाळ येथे गांधी चौक येथील पथनाट्य पाहिल्यानंतर बाजारपेठेतील स्वरूपानंद मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश पडते यांनी त्याच वेळी चालू असलेल्या स्वरूपानंद मित्र मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमात पथनाट्य सादर करण्याचे निमंत्रण दिले.
समितीच्या वतीने त्यांच्या कार्यक्रमात पथनाट्य सादर करण्यात आले. तेथे सुमारे ६०० लोक उपस्थित होते. पूर्ण बाजारपेठेत २ – ३ ठिकाणी त्यांनी ध्वनीक्षेपक बसवले असल्याने अनेक जणांपर्यंत सभेचा विषय आणि निमंत्रण पोेहोचले.
प्रत्यक्ष सभेपूर्वी आणि नंतरही अनेक जण थांबून पथनाट्य जिज्ञासेने पहात होते अन् चित्रीकरण करत होते.
– श्री. हेमंत मणेरीकर, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, सिंधुदुर्ग.