देहली : रामराज्याच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अलकनंदा, कालकाजी येथील श्री संतोषीमाता मंदिर आणि श्री रघुनाथ मंदिर या ठिकाणी रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. या वेळी मंदिरात उपस्थित असलेले भाविकही सामूहिक नामजपामध्ये सहभागी झाले होते. श्री रघुनाथ मंदिरामध्ये उपस्थितांना धर्माचरणाच्या कृतींविषयी माहिती देण्यात आली.
काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्याविषयी कृतज्ञता आणि अभिनंदन !
केंद्रशासनाने कलम ३७० हटवल्याविषयी अलकनंदा येथील श्री संतोषीमाता मंदिरामध्ये नुकताच हिंदु जनजागृती समितीकडून घंटानाद करण्यात आला. त्यानंतर ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आणि केंद्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले. सामूहिक ‘वन्दे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.