आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य मिळण्यासाठी मूर्तीकारांना साहाय्य करणारी योजना बनवावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे !
बेंगळुरू : शहरातील ‘जनपोषण’, ‘युनायटेड वे’ यांसारख्या अनेक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटना यांनी येत्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या श्री गणेशमूर्ती आणण्याऐवजी पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींना प्राधान्य देण्यासाठी मोहीम उभारली आहे. त्यात अनेक ठिकाणी कार्यशाळा आयोजित करून शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींचे महत्त्व विशद करून त्या कशा बनवाव्यात, याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या श्री गणेशमूर्तीवर बंदी घातली असली, तरी अनेक ठिकाणी अशाच मूर्ती स्थापन करण्यात येतात. ‘या कार्यशाळेद्वारे सुमारे ३ सहस्र व्यक्तींना शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तीं बनवण्याचे शिक्षण देण्यात येईल’, अशी आशा संघटनांच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली आहे. या कार्यशाळांना शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात