Menu Close

सोनगीर (धुळे) आणि अमळनेर (जळगाव) येथे ‘सार्वजनिक उत्सव समिती’ची बैठक

धुळे : उत्सवांचे पावित्र्य वाढावे यासाठी उत्सव मंडळांमधील अनुभवांची देवाण-घेवाण व्हावी आणि मंडळांना प्रशासनाकडून येणार्‍या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी सोनगीर (धुळे) आणि अमळनेर (जळगाव), तसेच नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव समिती’ची बैठक घेण्यात आली.

सोनगीर (धुळे)

सोनगीर येथील बैठकीत मार्गदर्शन करतांना साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर

येथे बैठकीच्या आरंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. ‘सार्वजनिक उत्सव आदर्श पद्धतीने कसे साजरे करावे ?’ याविषयी श्री. सचिन वैद्य यांनी मार्गदर्शन केले. उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्यासाठी काय करायला हवे ?, कोणते उपक्रम आपण राबवू शकतो ?, हिंदु राष्ट्रासाठी उत्सवाचे महत्त्व या विषयांवर कु. रागेश्री देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयावरील ध्वनीचित्रतबकडी (सीडी) या वेळी दाखवण्यात आली.

साहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर या वेळी म्हणाले, ‘‘समितीचे कार्य अत्यंत उत्कृष्ट आहे. ही ध्वनीचित्रतबकडी सर्वत्र दाखवण्याचे नियोजन करा.’’ उत्सवाच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्याविषयी आणि ‘एक गाव एक गणपति’ या संकल्पनेविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात १० गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.

अमळनेर (जळगाव)

अमळनेर येथे मार्गदर्शन करतांना डावीकडून श्री. सचिन वैद्य, श्री. पंकज बागुल

पाचपावली मंदिर, अमळनेर येथे ‘सार्वजनिक उत्सव समन्वय समिती’ची बैठक पार पडली. आदर्श गणेशोत्सव कसा असावा ?, तसेच उत्सवाचा उद्देश आणि पार्श्‍वभूमी या संदर्भात श्री. सचिन वैद्य यांनी मार्गदर्शन केले. आपल्या मंडळाचा आदर्श समाजासमोर कशा प्रकारे निर्माण करू शकतो ?, या संदर्भात श्री. पंकज बागुल यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला उपस्थित सर्वच मंडळ पदाधिकार्‍यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर येथील धर्मप्रेमी श्री. शिवकिरण बोरसे, श्री. विनोद जोशी, श्री. सुरेश चौधरी, श्री. भैय्या शेटे यांनी केले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *