-
अमेरिकेतील हिंदूंनी दर्शवला तीव्र विरोध
-
रेस्टॉरंटच्या धर्मांध मालकाने विरोधाला न जुमानल्याने हिंदु धर्माचा अवमान चालूच !
केमाह, टेक्सास (अमेरिका) : अमेरिकेतील सॅन ऍनटॉनिया डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार टेक्सास राज्याच्या केमाह येथील डेअरी क्विन या रेस्टॉरंटने हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्लाघ्य विडंबन केले आहे. रेस्टॉरंटने विविध ठिकाणी हिंदु धर्माचा अनादर करणारे फ्लेक्स फलक लावले आहेत. यात हिंदु धर्माची माकडाशी तुलना करण्यात आली आहे, तसेच देवता आणि ऋषिमुनी यांनाही विडंबनात्मकरित्या चित्रित करण्यात आले आहे. मूळचा पाकिस्तानी असलेला आणि अमेरिकेचे नागरिकत्व असलेला महंमद दार हा डेअरी क्विन या रेस्टॉरंट गटापैकी (ब्रॅन्डचा) केमाहमधील रेस्टॉरंटचा मालक (फ्रॅन्चायजी ओनर) आहे.
हिंदूंनी या विडंबनाच्या विरोधात तीव्र आक्षेप घेत देवतांचा अवमान करणारे सर्व फ्लेक्स फलक रेस्टॉरंटमधून काढून टाकावेत, अशी जोरदार मागणी केली आहे; परंतु महंमद दार याने या विरोधाला न जुमानता उलटपक्षी, माझा हिंदु धर्माविषयी कोणताच पूर्वग्रह नाही. मी गेली १४ वर्षे हिंदु धर्माचा अभ्यास केला असून हिंदू भेदभाव पाळतात, हे सांगू इच्छितो. त्यांना कशाचेच बंधन नसून ते कोणताही कायदा मानत नाहीत. ते प्राण्यांप्रमाणे आपल्या इच्छा पूर्ण करतात. हीच हिंदु धर्माची शिकवण असून मी त्यांची तुलना माकडाशी केली आहे, असे म्हटले आहे. (जगभरात शरिया कायदा लागू करण्यासाठी धडपडणारे धर्मांध अमेरिकेसह प्रत्येक देशाला डोईजड झाले असतांना हिंदु धर्माविषयी धादांत खोटी माहिती प्रस्तुत करून दार यांना जन्नत मिळणार आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पीअरलन्ड येथील श्री मीनाक्षी टेम्पल सोसायटी या हिंदु संघटनेने रेस्टॉरंटने केलेल्या या विडंबनाचा तीव्र विरोध केला आहे. डेअरी क्विनच्या कॉर्पोरेट कार्यालयाने मात्र दार यांनी केलेल्या या कृतीला दुर्दैवी म्हटले असून आपला विरोध दर्शवला आहे. (डेअरी क्विनने केवळ या कृतीला दुर्दैवी न म्हणता हिंदूंचा अनादर करणारे हे फ्लेक्स काढून टाकून महंमद दारवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात