धर्माभिमान्यांकडून प्रशासनाला निवेदन सादर
चिंचवड : डुडुळगाव येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळा क्रमांक १०८ मध्ये १२ ऑगस्ट या दिवशी डुडुळगाव आणि माऊलीनगर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्या धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांच्या पुढाकाराने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यामध्ये माऊलीनगर येथील धर्माभिमानी महिलांचा सहभाग प्रशंसनीय होता. धर्माभिमान्यांनी स्वयंप्रेरणेने आणि पुढाकाराने निवेदन दिले. तीन महिला लहान मुलांना घेऊन दूरवरून आलेल्या होत्या. निवेदन दिल्यानंतर शिक्षकांशी चर्चा केली असता समितीच्या वतीने शाळेमध्ये स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेणे, क्रांतीकारकांचे सचित्र प्रदर्शन लावणे, पालक अन् शिक्षक यांच्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करणे आदी विविध उपक्रम राबवण्याचे ठरले, तसेच शिक्षकांनी ‘सनातन-निर्मित’ ग्रंथही खरेदी केले. या वेळी धर्माभिमानी सौ. रूक्मिणी माने, सौ. प्रियांका पाटील, सौ. भारती पाटील, सौ. रेखा पाटील, सौ. शिल्पा गावंडे, सौ. सुरेखा वहिले आणि श्री. रमेश वहिले आदी उपस्थित होते.