Menu Close

१५ ऑगस्टच्या निमित्ताने भातकुली आणि आसरा (जिल्हा अमरावती) येथे क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन

भातकुली गावातील प्रदर्शन आणि समजावून सांगतांना समितीचे श्री. पंकज क्षीरसागर

अमरावती : भातकुली तालुक्यातील जसापूर या गावात हिंदु जनजागृती समितीचा स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालतो. त्यामधील युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे भातकुली गावात, तसेच आसरा या गावातील शाळेत क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावले.

आसरा गावातील प्रदर्शनातील माहिती वहीत जिज्ञासेने लिहून घेतांना विद्यार्थिनी

या प्रदर्शनाची पूर्ण सिद्धता या धर्मप्रेमींनी केली. या गावांमध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम घेण्यात आला. या वेळी उपक्रम स्तुत्य असल्याचे मत आसरा गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. ही धर्मसेवा करून पुष्कळ आनंद मिळाल्याचे उपस्थित धर्मप्रेमींनी सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *