सनातन धर्माच्या विश्वव्यापक रूपाचा पुन्हा मिळाला पुरावा
जर्मनी : येथे एका गुहेत भगवान श्रीविष्णूचा चौथा अवतार असलेल्या नृसिंहाची ३२ सहस्र वषेर्र् जुनी मूर्ती पुरातत्ववेत्त्यांना सापडली आहे. त्यामुळे जगातील सर्व धर्मांपैकी सनातन वैदिक हिंदु धर्म अनादि आणि सर्वांत प्राचीन असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे, असे सांगण्यात येत आहे. पाश्चिमात्य पुरातत्ववेत्त्यांनुसार सापडलेली ही मूर्ती कोणत्या तरी मंदिराच्या मुख्य देवतेची मूर्ती आहे.
नृसिंहाने भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी त्याचे वडील आणि राक्षस हिरण्यकश्यपूचा वध केला. हिरण्यकश्यपूचा शिवाचा वर होता की, त्याला दिवसाही मृत्यू येणार नाही आणि रात्रीही नाही. त्यामुळे भगवान नृसिंहानी त्याचा तिन्हीसांजेला वध केला. या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही जर्मनीमध्ये मिळणार्या अन्य साधारण मूर्तींपेक्षा वेगळी आहे. संगमरवराने बनवलेली ही मूर्ती जर्मनीत सापडलेल्या मोठ्या मूर्तींपैकी एक आहे. (जगाच्या कानाकोपर्यात वेळोवेळी मिळणार्या प्राचीन मूर्ती आणि कलाकृती पाहिल्यास विश्वाच्या आरंभी केवळ एकच धर्मच अस्तित्वात होता, हे सिद्ध होते. हिंदूंनो, याविषयी अभिमान बाळगा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात