Menu Close

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध

धुळे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला काळे फासणार्‍यांचा जाहीर निषेध !

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करतांना धर्मप्रेमी

धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नुकतेच देहली विद्यापिठात स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हुतात्मा भगतसिंग यांचे पुतळे बसवले होते. काँग्रेसच्या एन्.एस्.यु.आय. या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोह्यांनी यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासले. ही अतिशय संतापजनक कृती असून याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी डी. गंगाधरण यांच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. तसेच या घटनेचा निषेध करत येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसने स्वातंत्र्यानंतरही १८ वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर आजपर्यंत तो करतच आहे. आता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती करतो की, हा अपमान कायमचा थांबवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ घोषित करावे आणि राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची विटंबना करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याचा नवा कायदा बनवून देशविरोधी शक्तींवर वचक बसवावा. हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना खरी मानवंदना ठरेल.’’

या वेळी सर्वश्री शुभम मतकर, सौरभ मतकर, राजू महाराज मराठे, नितीन घाटी, अनिल दीक्षित, महेश कुलकर्णी, महेश माळी, गोपाल शर्मा, प्रवीण दडपे, योगेश भोकरे, मनोज पिसे, ईश्‍वर मोरे, गणेश माळी, दिनेश कुलकर्णी, किशोर अग्रवाल, नंदकिशोर पवार, ऋषिकेश वाघ, आकाश हजारे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.

नाशिक येथे आंदोलनाद्वारे सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी !

आंदोलनाच्या वेळी विषय मांडतांना शिवाजी उगले आणि हिंदुत्वनिष्ठ

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासणार्‍यांवर कठोर कारवाई करा आणि सावरकरांना सन्मान मिळवून देण्यासाठी तात्काळ ‘भारतरत्न’ घोषित करा, अशी मागणी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांनी केली. शहरातील गंगापूर रस्ता परिसरातील आकाशवाणी चौकात २३ ऑगस्टला हे आंदोलन घेण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देहली विद्यापिठात बसवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोह्यांनी काळे फासून विटंबना केली. ही संतापजनक कृती असून याचा कितीही निषेध केला, तरी अल्पच आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा आणि कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी उगले यांनी या वेळी केली. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ घोषित करण्याची मागणीही करण्यात आली.

आंदोलन झाल्यानंतर येथील उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी २५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना न मानणार्‍यांना भर चौकात फटकावले पाहिजे ! – उद्धव ठाकरे

मुंबई : जे लोक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानत नाहीत, त्यांना भर चौकात फटकावले पाहिजे, असा संताप शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.२३ ऑगस्ट या दिवशी शेतकरी पीक विम्याविषयी श्री. ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी पत्रकारांनी देहली विद्यापिठाच्या आवारातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या विटंबनेविषयी मत विचारले. त्या वेळी श्री. ठाकरे यांनी वरील उद्गार काढले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *