सातारा : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा, संगममाहुली, वर्णे येथे ११ ते १६ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक ठिकाणी पाच दिवसांचे स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते. आपत्काळात येणार्या प्रसंगांचा सामना करण्याचे प्रशिक्षण युवक-युवती यांना देण्यात आले. प्रशिक्षणवर्गाची सांगता ‘वन्दे मातरम्’ या गीताने करण्यात आली. या वेळी मातृभूमीप्रतीही कृतज्ञता व्यक्त केली गेली. प्रशिक्षणवर्गाचा लाभ ३५ धर्मप्रेमींनी केला. प्रतिदिन एकत्र येऊन स्वरक्षणाचा सराव करण्याचे ठरले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त सातारा येथे ५ दिवसांचा स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग
Tags : Hindu Janajagruti Samiti