Menu Close

ख्रिस्ती मिशनर्‍यांना भारतात येण्यासाठी टुरिस्ट व्हिसा न देण्याची केंद्रशासनाकडे मागणी करणारी ऑनलाईन याचिका प्रविष्ट !

हिंदूंचे जलदगतीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी चळवळ

नवी देहली : हिंदूंचे जलदगतीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी चेंज डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर २४ मार्च या दिवशी एक ऑनलाईन याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या कुटील हेतूने विदेशातून अनेक ख्रिस्ती मिशनरी भारतात प्रवेश करण्यात यश मिळवतात. हे मिशनरी टुरिस्ट व्हिसावर भारतात येतात आणि हिंदूंच्याच पाठीत धर्मांतररूपी खंजीर खुपसतात. यावर आळा बसावा आणि अशा मिशनर्‍यांना भारतात प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

भारतीय वकिलाती कार्यालये विदेशी नागरिकांना भारतीय व्हिसाचे नियम लागू करत नसल्याचे आणि मिशनर्‍यांची कोणतीही शहानिशा न करताच त्यांना भारतीय व्हिसा देण्याचा गंभीर आरोपही या याचिकेद्वारे याचिकाकर्त्याने केला आहे. (केंद्रशासनाने या गंभीर आरोपाची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी हिंदु धर्माभिमान्यांची मागणी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

ट्विटरच्या @noconversion नावाच्या खात्यावरून या याचिकेविषयी प्रसार करण्यात येत आहे. गेल्या ३ दिवसांतच या याचिकेवर १ सहस्रहून अधिक लोकांनी स्वाक्षरी केली आहे.

चेंज डॉट ऑर्गवरील ऑनलाईन याचिकेची मार्गिका (लिंक) – goo.gl/5m19Fx

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *