पोलिसांकडून गुन्हा नोंदवतांना गोतस्करांचा उल्लेख टाळल्याने हिंदूंच्या संघटना संतप्त
- कायदाद्रोही पोलीस !
- अशा पोलिसांवर सरकारने कारवाई करावी !
पीलीभीत (उत्तरप्रदेश) : येथे गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्या सोनू या २३ वर्षीय तरुणाचा गोतस्करांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचा गुन्हा नोंदवतांना पोलिसांनी गोतस्करांकडून गोळीबार झाल्याचा उल्लेख टाळल्याने हिंदु युवा वाहिनी आणि अन्य संघटना यांनी ‘पोलिसांनी याचे स्पष्टीकरण द्यावे’, अशी मागणी केली आहे. संतप्त लोकांनी पोलिसांना आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. तसेच सोनूच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये साहाय्य करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
सोनूने रात्री पाहिले की, काही गोतस्कर रस्त्यावरील गायींना पिक अप गाडीमध्ये भरून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा त्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता गोतस्करांनी त्याला मारहाण केली. या गोंधळाची माहिती मिळताच शेजारीही तेथे आल्यावर गोतस्करांनी गोळीबार करत पलायन केले. यात सोनू याला गोळी लागली. त्याला बरेली येथील रुग्णालयात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात