बारवाड (जिल्हा बेळगाव, ता. चिकोडी) : ‘सनातन संस्था कोल्हापूर’ या न्यासाच्या वतीने आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बारवाड येथील नवे विठ्ठल मंदिर या ठिकाणी १८ ऑगस्ट या दिवशी पूरग्रस्तांसाठी आरोग्य तपासणी अन् विनामूल्य औषध शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ ४०० हून अधिक पूरग्रस्तांनी घेतला. रुग्णांची तपासणी सनातन संस्था कोल्हापूरचे डॉ. मानसिंग शिंदे, कागल येथील वैद्य आशुतोष विभूते यांनी केली. यांना परिचारिका सौ. सविता सणगर यांनी साहाय्य केले.
या शिबिरासाठी हिंदवी स्वराज्य तरुण मंडळाचे श्री. सुभाष पाटील, श्री. बाळासो पाटील, श्रीराम सेनेचे श्री. अमोल पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी शिबिरासाठी उपस्थित डॉक्टर आणि कार्यकर्ते यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. डॉ. मानसिंग शिंदे यांचा सत्कार श्री. वसंत महादेव पाटील, श्री. किरण दुसे यांचा सत्कार बारवाड डेअरीचे अध्यक्ष श्री. अण्णासो ज्ञानू चौगुले, डॉ. आशुतोष विभूते यांचा सत्कार श्री. आप्पासो बापू पाटील, तसेच श्री. अरविंद सनगर यांचा सत्कार श्री. विजय बाजीराव पाटील आणि सौ. सविता सणगर यांचाही सत्कार करण्यात आला.
शिबिराचा समारोप झाल्यानंतर श्री. अण्णासो ज्ञानू चौगुले यांनी ‘सनातन संस्था कोल्हापूर’ न्यास आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. ‘दूध डेअरीच्या कर्मचार्यांसाठी आम्ही लवकरच एका शिबिराचे आयोजन करू’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.