यवतमाळ : राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी क्षात्रतेजासमवेत ब्राह्मतेजाची आवश्यकता आहे; त्यासाठी सर्वांनी नामस्मरण करून धर्मरक्षणासाठी संघटित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. मंगेश खांदेल यांनी केले. ते संत दावजी महाराज मंदिर, सावर (जिल्हा यवतमाळ) येथे १९ ऑगस्टला बजरंग दल शाखेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना व्यसनांपासून दूर ठेवले. त्यांचा आदर्श घेऊन आपणही व्यसनांपासून दूर रहावे, असे आवाहन येथील ह.भ.प. कपिले महाराज यांनी या वेळी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा सामूहिक नामजप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी बजरंग दलाचे ७० कार्यकर्ते उपस्थित होते.