पाटलीपुत्र (पाटणा) : येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. राकेश दत्त मिश्र यांच्या कार्यालयात त्यांच्या कार्यकर्त्यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजयकुमार सिंह यांनी ‘राष्ट्र आणि धर्म’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन केले. या वेळी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ याविषयी सांगतांना सिंह म्हणाले, ‘‘काश्मीरमधून गेल्या २९ वर्षांपासून विस्थापित झालेल्या हिंदूंचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही; मात्र बाहेरून आलेल्या रोहिंग्यांना भारतात आश्रय मिळावा, यासाठी मानवाधिकाराच्या नावावर धर्मनिरपेक्षतावादी नेते सरकारवर दबाव निर्माण करतात.’’ श्री. सिंह यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात साधनेची आवश्यकता का आहे ?’ यासंदर्भातही उपस्थितांना माहिती दिली. हिंदुत्वनिष्ठ श्री. मिश्र गोवा येथे झालेल्या अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. डॉ. रंजन कुमार यांनी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान करा’, या आशयाची १ सहस्र पत्रके छापण्याचे निश्चित केले होते.
२. माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. रमेश उपाध्याय यांनी हिंदु जनजागृती समितीला आवश्यक असलेली कोणतीही माहिती माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत मिळवून देण्याची सिद्धता दर्शवली.