नंदुरबार : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागदी लगद्यापासून सिद्ध होणार्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देणे थांबवण्यात यावे या मागणीसह गणेशोत्सव मंडळांना येणार्या अडचणींविषयीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी श्री. दिलीप जगदाळे यांना २३ ऑगस्ट या दिवशी देण्यात आले.
‘गणेशोत्सवाच्या काळातील अडचणी आणि या काळात होणार्या अपप्रकारांचे निराकरण करावे’, या आशयाचे निवेदन समिती आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आले. या वेळी ‘आदर्श गणेशोत्सव कसा असावा’ या विषयाची संपूर्ण ध्वनिचित्रफीत पोलीस अधीक्षकांनी पाहिली. ते म्हणाले, ‘‘शहराच्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत आम्ही ही ध्वनिचित्रफीत दाखवू आणि समितीलाही आमंत्रित करू.’’
नगरपालिकेने गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी पुरो(अधो)गाम्यांच्या प्रभावाला बळी पडून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत, अशा आशयाचे निवेदन प्रशासकीय अधिकारी श्री. दिपक मुळे यांना देण्यात आले.