Menu Close

(म्हणे) ‘भाजप नेत्यांच्या मृत्यूच्या मालिकेत पुढचा क्रमांक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा !’ : लॉर्ड नझीर अहमद

विघ्नसंतोषी पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश खासदार लॉर्ड नझीर अहमद यांचा दावा !

  • धर्मांधांना ‘पंतप्रधान मोदी यांचा मृत्यू व्हावा’, असे वाटणारच !
  • ब्रिटनसारख्या सुधारणावादी आणि मुक्त वातावरणात वावरूनही पाक वंशाच्या धर्मांध ब्रिटीश राजकारण्याच्या मानसिकतेत पालट होत नाही, हे लक्षात घ्या !

लंडन : भाजप नेत्यांचे एकापाठोपाठ एक निधन होत आहे आणि आता पुढचा क्रमांक नरेंद्र मोदी यांचा आहे, अशा आशयाचे ट्वीट ब्रिटनचे खासदार आणि पाकिस्तानी  वंशाचे लॉर्ड नझीर अहमद यांनी केले आहे. गेल्या वर्षभरात भाजपचे अटलबिहारी वाजपेयी, मनोहर पर्रीकर, बाबूलाल गौर, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचे निधन झाले. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे ट्वीट केले आहे. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या ब्रिटीश बुद्धीवादी वर्गाकडे पाहिले की, या भूमीवर कुठले-कुठले लोक आलेत, हेच मला समजत नाही. लोकांना फितवून तुम्ही ‘हाऊस ऑफ लॉर्ड’चे सदस्य झाला आहात का?’, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *