कराड : येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भिलवडी येथील मजुरी करून जीवन जगणार्या कामगारांच्या वस्तीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तांदूळ, डाळ, तेल, साखर, चहा पावडर, कांदे, साबण, अगरबत्ती, पीठ, स्वयंपाकासाठी लागणारे सर्व साहित्य यांचे वाटप करण्यात आले. या वेळी भिलवडी गावातील काही जागृत नागरिकांनी ज्या पूरग्रस्तांना साहाय्याची आवश्यकता आहे, तेथे पोचण्यास आम्हाला साहाय्य केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत, श्री. अनिल कडणे, सनातन संस्थेचे श्री. लक्ष्मण पवार, श्री. रवि घाडगे आदी उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भिलवडी येथील पूरग्रस्त मजूर कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Tags : Hindu Janajagruti Samiti