थिरूवनंतपूरम् : आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेच्या (आंहिप) ‘हिंदु हेल्पलाइन’ विभागाकडून केरळ राज्यात पहिले हिंदु सेवाकेंद्र एर्नाकुलम् जिल्ह्यातील कलाडी येथे नुकतेच चालू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे राष्ट्रीय सचिव श्री. प्रदीश विश्वनाथ यांनी केले. आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी ‘हिंदु हेल्पलाइन’ चे समन्वयक श्री. बिनिल सोमसुंदरम् आणि बजरंग दलाचे राज्य सरचिटणीस श्री. विपिनलाल उपस्थित होते. गरीब हिंदूंना तांदूळ, औषधे इत्यादी पुरवणे, त्यांना सरकारी योजनांची माहिती देणे आणि धर्मांतर, लव्ह जिहाद, जिहादी आक्रमणे यांच्या विरोधात साहाय्य करणे, या हेतूने ग्रामपंचायत पातळीवर अशा प्रकारची हिंदु सेवाकेंद्रे उभारण्यात येत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात