मध्यप्रदेशातील जबलपूर आणि मंडला येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळे’त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन
जबलपूर : हिंदु राष्ट्राच्या अर्थात् रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला रामायणातून बोध घ्यायला हवा. बाहुबळ आणि संख्याबळ यांवर विसंबून न रहाता आपल्याला साधनेने धर्मबळ प्राप्त करायचे आहे. अर्जुनासमवेत श्रीकृष्ण अर्थात् धर्म असल्याने पांडव विजयी झाले, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते १७ ऑगस्ट या दिवशी जबलपूर येथे, तर १८ ऑगस्ट या दिवशी मंडला येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यशाळेत त्यांनी ‘हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना’ आणि ‘तणावमुक्तीसाठी साधनेची आवश्यकता’ या विषयांवर मार्गदर्शन केले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी धर्माचरणाच्या कृतींची माहिती दिली, तसेच ‘वाईट शक्तींच्या प्रभावामुळे निर्माण होणार्या कौटुंबिक समस्या आणि त्यांचे समाधान’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दोन्ही कार्यशाळांचा ७० हून अधिक कार्यकर्त्यांनी लाभ घेतला. जबलपूर येथे श्री. सचिन पटेल यांनी, तर मंडला येथे
श्री. ऋषभ गुप्ता यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी, पदाधिकारी श्री. जितेंद्र चिमनानी, श्री. नितीन सोनपल्ली, श्री. धर्मेंद्रसिंह ठाकूर, डॉ. संतोष कच्छवाह, श्री. दुर्गेश ठाकूर यांच्या पुढाकाराने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.
क्षणचित्र : या दोन्ही कार्यशाळांमध्ये रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘रामनाम संकीर्तन अभियान’ राबवण्यात आले. युवकांनी प्रार्थना करून १० मिनिटे सामूहिक रामनामाचा जप केला. काही युवकांनी त्यांच्या भागात आठवड्यातून १ दिवस अशा प्रकारे रामनामाचा जप करण्याची सिद्धता दाखवली.