ट्रम्प यांनी पाकवर टीका केल्यावरही भारतीय शासन पाकच्या विरोधात कृती करणार नाही; कारण तसे करणे हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असून त्यामुळे भारतातील मुसलमानांचा आणि ढोंगी धर्मनिरपेक्षवाद्यांचा विरोध होऊ शकतो !
वॉशिंग्टन : अण्वस्त्र बाळगणारा पाकिस्तान आमच्या देशासाठी एक गंभीर समस्या निर्माण करू शकतो, अशा वेळी आम्हाला त्यावर नियंत्रण मिळवायला हवे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सीएन्एन् या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
लाहोरमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या संदर्भात ट्रम्प म्हणाले की, येथे झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी अधिकाधिक ख्रिस्ती नागरिक ठार झाले आहेत. मी इस्लामी आतंकवादाची समस्या सोडवू शकतो; मात्र लोक इस्लामी आतंकवादाच्या सूत्रावरून मलाच विरोध करतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात