बेळगाव : दैवेज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघ यांनी शाहपूर, बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पूरग्रस्तांना डेंगू, चिकनगुनिया यांना प्रतिबंध करणारे मोफत होमिओपॅथी औषध देण्यात आले. या उपक्रमात डॉ. राजकुमार देसाई, डॉ. ज्योती दाभोलकर, डॉ. नम्रता कुत्रे आणि कु. गौरी कारेकर यांनी सहभाग घेतला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोंडवाड, बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा ३०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोकाक, बेळगाव येथे पूरग्रतांना साहाय्य
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोकाक, बेळगाव येथे पूरपीडितांना आवश्यक जीवनाश्यक साहित्य आणि कपडे यांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर सर्वांना मानसिक आधार देण्यात आला, तसेच ईश्वराची कृपा संपादन करण्यासाठी साधना सांगण्यात आली.
सनातन संस्थेच्या वतीने वाळवा (जिल्हा सांगली) येथे पूरग्रस्तांना धान्य आणि साड्या यांचे वाटप
सनातन संस्थेच्या वतीने लक्ष्मीनगर, वाळवा येथील श्री लक्ष्मी मंदिरामध्ये पूरग्रस्तांना धान्य, साड्या आणि उदबत्ती यांचे वाटप करण्यात आले. हे वाटप या मंदिराचे पुजारी श्री. सदाशिव आनंदा गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.
गोंडवाड, बेळगाव येथे पूरग्रस्तांना ‘प्रथमोपचार आणि साधना’ यांविषयी मार्गदर्शन
गोंडवाड, बेळगाव येथे पूरग्रस्तांना ‘प्रथमोपचार आणि साधना’ यांविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.