कुर्ला (पश्चिम), मुंबई : आज देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अधिकाधिक तरुणांनी पुढे आले पाहिजे. सध्याची युवा पिढी लवकर थकते; कारण आपण केवळ छत्रपती शिवरायांचा जयजयकार करतो, परंतु त्यांना आचरणात आणत नाही.
ज्या शिवरायांमुळे आज आपले घर आणि संसार सुरक्षित आहे, त्या शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या ठिकाणी मात्र आपण कचरा टाकून, मेजवान्या करून त्यांचे पावित्र्य नष्ट करतो, असे प्रतिपादन इतिहासतज्ञ डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. येथील श्री साईनाथ नगर मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवचरित्र व्याखानाचे आयोजन २७ मार्च २०१६ या दिवशी करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी श्री साईनाथ नगर मित्रमंडळाचे कार्यकर्ते सर्वश्री कैलाश शृंगारे, अजय समगिरे, महेश शिंदे, डोंबाळे आणि जाधव यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शिवरायांच्या उत्स्फूर्त घोषणांनी कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाला श्री. उमेशजी गायकवाड, बजरंग दल (कोकण प्रांत) आणि स्थानिक शिवसेनेचे आमदार श्री. मंगेश कुडाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाला ४५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात