Menu Close

तिरुपतीच्या बस तिकिटांच्या माध्यमातून होणारा ख्रिस्ती धर्माचा प्रचार बंद करावा ! – धर्माभिमानी हिंदू

आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्यांत राष्ट्रीय हिंदू आंदोलनांना धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाग्यनगर : तिरुपतीच्या बस तिकिटांच्या मागील बाजूला जेरुसलेम यात्रेविषयी मजकूर छापून ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणे, आंध्रप्रदेश सरकारकडून नवीन अंदाजपत्रकामध्ये हिंदु पुजार्‍यांना डावलून मुसलमान मौलवी आणि ख्रिस्ती पाद्री यांच्यासाठी ९४० कोटी ७२ लाख रुपये संमत करणे यांविरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम्, तसेच तेलंगणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. ख्रिस्ती चर्चमध्ये आर्थिक घोटाळेे आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे चर्चचेही सरकारीकरण करण्यात यावे, अशी मागणी या आंदोलनांमध्ये करण्यात आली.

भाग्यनगर येथील आंदोलनामध्ये शिवसेना, हिंदू एकता मंच, हिंदु जनशक्ती, रिक्लेम टेम्पल्स, बजरंग दल हिन्दुस्तान, दीक्षा फाऊंडेशन, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटना सहभागी झाल्या. इंदूर येथील आंदोलनामध्ये श्री श्री फाऊंडेशन, राष्ट्रीय शिवजी सेना, हिंदु वाहिनी, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांनी सहभाग घेतला, तसेच विशाखापट्टनम् येथेही आंदोलनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

क्षणचित्र

‘रिक्लेम टेंपल’च्या सूर्यकला म्हणाल्या, ‘‘मंदिरांचे धन अन्य पंथियांना दिले जात आहे. मंदिरांच्या भूमी अवैधपणे विक्री केल्या जात आहेत, तसेच मंदिरांच्या परिसरांमध्ये अन्य पंथियांना व्यवसाय करण्याची अनुमती दिली जात आहे.’’

आंध्रप्रदेशच्या ८२ टक्के हिंदूंनी जगनमोहन रेड्डी यांना सत्तेवर बसवले, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! – टी.एन्. मुरारी, शिवसेना अध्यक्ष, आंध्रप्रदेश तथा तेलंगण

आंध्रप्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांचे सरकार येऊन काही मासच झाले; मात्र सत्ता येताच हिंदुविरोधी कारवायांना प्रारंभ झाला आहे. अनेक हिंदुविरोधी कायदे बनवले जात आहेत आणि उघडपणे ख्रिस्ती धर्माचा प्रचार चालू करण्यात आला आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *