बारवाड (जिल्हा बेळगाव) : गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशाचे चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्याचा लाभ करून घेण्यासाठी, तसेच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला आदर्श गणेशोत्सव होण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी धर्मशास्त्रानुसार गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. बारवाड येथील नवे विठ्ठल मंदिर येथे २६ ऑगस्ट या दिवशी गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विविध मंडळांचेे ३२ प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर यांनी केले. बैठकीनंतर आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आणि मूर्तीदान अशास्त्रीय कसे ? याविषयी ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. या वेळी ३ गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या मंडळात प्रवचन आयोजित करत असल्याचे सांगितले. उपस्थितांना श्री गणेशाची माहिती देणारे हस्तपत्रक वितरित करण्यात आले.
क्षणचित्र : बैठकीच्या शेवटी हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाचे श्री. बाळासाहेब पाटील यांनी गावात अधिकाधिक मंडळांपर्यंत हा विषय पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे सांगितले.