Menu Close

हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आलेला #RenameTippuExpress ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये १० व्या स्थानी

भाजप सरकारने ज्याप्रमाणे कर्नाटकातील टिपू जयंती बंद केली, त्याप्रमाणे केंद्रातील सरकारने टिपू एक्सप्रेसचे नाव पालटून हिंदूंच्या भावनांची नोंद घ्यावी !

मुंबई : लाखो हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावे चालू असलेल्या टिपू एक्सप्रेसचे नाव पालटून त्याला राजा कृष्णदेवराय अथवा अन्य राष्ट्रपुरुषाचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी २७ ऑगस्ट २०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समिती तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने #RenameTippuExpress हा ट्विटर ट्रेंड प्रसारित करण्यात आला. ट्रेंड चालू केल्यावर काही वेळातच त्याच्याशी संलग्न असलेला कीवर्ड (शब्द) Tipu Sultan हा राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ६ व्या स्थानी आला होता. तसेच #RenameTippuExpress हा ट्रेंड १० व्या स्थानी होता. या ट्रेंडमध्ये शेकडो धर्मप्रेमी हिंदूंनी सहभाग घेतला. या ट्रेंडचा रीच (विषय) लाखो लोकांपर्यंत पोचला.

या ट्रेंडची नोंद घेत अन्य प्रसारमाध्यमांनीही या ट्रेंडविषयी बातमी प्रसिद्ध केली. वृत्त प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळांमध्ये द न्यूज मिनिट, वन इंडिया (इंग्रजी आणि कन्नड भाषा) यांचा समावेश आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *