वणी (यवतमाळ) : येथील तहसील चौक येथे २८ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. जय श्रीराम न म्हटल्याने मारहाण झाल्याचा खोटा कांगावा करणार्यांवर एक विशेष अन्वेषण पथक नेमून कठोर कारवाई करण्याची मागणी समितीचे श्री. लहू खामणकर यांनी या वेळी केली. आंदोलनात राष्ट्रीय हरित लवादा च्या निर्णयानुसार कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी आणावी, आर्थिक घोटाळ्यासमवेत चर्च लैंगिक शोषणाची केंद्रे बनल्याने त्यांचे सरकारीकरण करावे आणि आंध्रप्रदेश सरकारने मतपेटीच्या लाभासाठी इमाम, मौलाना आणि ख्रिश्चन पास्टर यांना मासिक वेतन देण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ रहित करण्यात यावा, या मागण्याही करण्यात आल्या. या आंदोलनात सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
Tags : Anti HindusGaneshotsavHindu Janajagruti SamitiHindu Rashtra Jagruti AndolanProtest by HindusSanatan-Sansthaख्रिस्तीहिंदूंच्या समस्या