कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात चालत आलेली श्री गणेशमूर्ती विसर्जनाची पद्धती चालू राहू द्यावी. कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्तीदान या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत, या मागणीसाठी २९ ऑगस्ट या दिवशी मलकापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. मलकापूर येथील नगरपालिकेचे अधिकारी ए.के. पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पौरोहित्य संघटनेचे सदस्य, शिवसेनेच्या नगरसेविका सौ. माया पाटील, जनसुराज्य पक्षाचे नगरसेवक विकास देशमाने, सर्वश्री चारूदत्त पोतदार, रमेश पडवळ, जितेंद्र पंडित, वसंत जोशी, रवींद्र जोशी, प्रदीप पवार, मानसिंग देसाई यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक यांसह २० जण उपस्थित होते.