काठमांडू : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हे धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांसाठी नेपाळच्या दौर्यावर होते. त्या कालावधीत २३ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. माधव भट्टराई यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भारत सरकारने जम्मू-कश्मीर विषयी घेतलेल्या निर्णयाविषयी प्राध्यापक डॉ. माधव भट्टराई यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी त्यांनी शिक्षण कॅम्पस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना धर्माचे महत्त्व समजावे, यासाठी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. याप्रसंगी शिक्षण कॅम्पस कॉलेजचे संचालक श्री. शत्रुघ्न प्रसाद गुप्ता हे उपस्थित होते.
राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. माधव भट्टराई यांची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सदिच्छा भेट !
Tags : Hindu Janajagruti Samiti