वर्धा : पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली वर्षातून एकदा येणार्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चुकीच्या मोहीमा राबवून धार्मिक भावना दुखावण्याचे कार्य प्रशासनाकडून होत आहे. गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून कृत्रिम तलाव आणि गणेशमूर्तीदान या धर्मबाह्य संकल्पना राबवून चालवलेली घोर विटंबना तातडीने थांबवण्याविषयी २६ ऑगस्ट या दिवशी येथील नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री. किशोर साखरकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.