कल्याण : वर्षाचे ३६५ दिवस सांडपाणी आणि घनकचरा यांद्वारे होणार्या भीषण प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत कृत्रिम तलाव आणि मूर्तीदान ही अशास्त्रीय संकल्पना राबवून त्याद्वारे होणारे जलप्रदूषण आणि श्री गणेशमूर्तींची विटंबना तातडीने रोखण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे स्थायी समितीचे सभापती श्री. दीपेश म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी नैसर्गिक तलावामध्ये जाळी आणि दगडी भिंत उभारून एका बाजूला श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करू, असा ठराव मांडण्याचे आश्वासन दिले.