Menu Close

गोवा : मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमींकडून रंगेहात पकडून यथेच्छ चोप

कुडचडे : काकोडा येथे मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमी युवकांनी रंगेहात पकडून यथेच्छ चोप दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर गुरांच्या मालकांनी सजग होऊन गुरे मोकाट सोडू नये, अशी मागणी गोप्रेमी करत आहेत. मोकाट फिरणार्‍या गुरांना चोरून पशूवधगृहात नेले जात असल्याचा संशय कुडचडे येथील गोप्रेमींना आला. गुरे चोरून नेणारे मोकाट गुरे कुठे बसतात, याची प्रथम टेहळणी करतात. यानंतर बैलाची निवड करून त्याला फास टाकून आडोशाला बांधून ठेवले जाते. मध्यरात्री किंवा पहाटे भाड्याची रिक्शा करून बैल पशूवधगृहात नेला जातो. गुरे चोरण्याची ही पद्धत गोप्रेमींना ठाऊक होती. ३० ऑगस्टला रात्री एका बैलाला रस्त्याच्या बाजूला बांधून ठेवल्याचे गोप्रेमींच्या लक्षात आले. त्यांनी रात्रभर पाळत ठेवून पहाटे साडेचारच्या सुमारास बैल चोरण्यासाठी आलेल्याला रंगेहात पकडले आणि त्याला यथेच्छ चोप दिला. रिक्क्षाचालकावरही गोप्रेमींनी रोष व्यक्त केला.

गुरे परवडत नसल्यास ती गोशाळेला दान करण्याचे गोप्रेमींचे आवाहन

भातशेतीची कामे आता बैलांमार्फत केली जात नाहीत. गायीगुरे सांभाळणे परवडत नसल्याने त्यांना मोकाट सोडून दिले जात आहे. ही मोकाट गुरे रस्त्यावर ठाण मांडून असतात. मोकाट गुरांमुळे अपघातही घडत असतात. ही मोकाट गुरे पुढे चोरट्यांच्या हाती लागून त्यांना पशूवधगृहात नेले जाते. हे टाळण्यासाठी गुरांच्या मालकांनी गायीगुरे सांभाळायची नसल्यास ती गोशाळेला दान करण्याचे आवाहन गोप्रेमींनी केले आहे.

तक्रार नसल्याने गुरे चोरणार्‍यांवर कोणताही गुन्हा नाही

काकोडा येथील गोप्रेमी युवकांनी घटनेविषयी कुडचडेे पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस त्या ठिकाणी आले. बैल चोरणारा संशयित आणि रिक्शाचालक यांना पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले. बैलाच्या मालकाने पोलीस ठाण्यात नाहक हेलपाटे किंवा पुढे न्यायालयात जाणे परवडणारे नसल्याने घटनेला अनुसरून तक्रार करण्यास नकार दर्शवला. तक्रार नसल्याने पोलिसांनी संशयितांच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंदवला नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *