प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमींच्या साहाय्याने राबवलेली आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१९
संभाजीनगर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चितेपिंपळगाव येथील सिद्धेश्वर लॉन्स येथे सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी चितेपिंपळगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील ७ गावातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी आणि धर्मप्रेमी सहभागी होते.
समाजामध्ये आदर्श गणेशोत्सवाच्या संदर्भात जागृती व्हावी, लोकमान्य टिळकांच्या उद्देश सफल व्हावा आणि लवकरात लवकर ईश्वरी राज्य यावे, यासाठी प्रत्येक गावातील धर्मप्रेमींचे संघटन होण्याची आवश्यकता आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी सर्वांना दिशादर्शन केले. या वेळी पाच ठिकाणी शौर्य जागरण शिबिर घेण्याची मागणी करण्यात आली. दोन ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती बैठकांचे आयोजन करण्यात आले.
तासगाव येथे नगराध्यक्षांना निवेदन
तासगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तासगाव येथे नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत आणि नायब तहसीलदार श्री. शहाजी जानराव यांना गणेशमूर्तीदानासाठी बळजोरी न करण्याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. गोविंद सोवनी आणि श्री. बाळासाहेब माळी यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.