-
गुरुकृपा परिवार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श गणेशोत्सव मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
-
प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमींच्या साहाय्याने राबवलेली आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१९
नाशिक : शास्त्रयुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वसुधा चौधरी यांनी येथे केले. गुरुकृपा परिवार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श गणेशोत्सव मोहिम या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
येथील धनलक्ष्मी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय येथे हा उपक्रम घेण्यात आला. सौ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करायचा ? यावर मार्गदर्शन केले. शाडू मातीच्या मूर्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. गणेशोत्सवाचे आध्यात्मिक आणि शास्त्रानुसार महत्त्वही सांगण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. कुशल अवसरमल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करायचा ? यावर मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्य समजावून सांगत प्रदूषण नियंत्रणासाठी आपले योगदान कसे असले पाहिजे यावरही मत मांडले. गुरुकृपा परिवाराचे श्री. शैलेश पोटे यांनी आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण काय करायला हवे ? यावर मार्गदर्शन केले. तसेच मानधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश कोल्हे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींचे परीक्षण करण्यात आले. ३ उत्कृष्ट मूर्तीकार विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. आम्हाला आज पुष्कळ चांगले शिकायला मिळाले, असे विद्यार्थ्यांनी कार्यक्रम संपल्यावर मान्यवरांशी बोलतांना सांगितले.