-
हिंदु जनजागृती समितीने ट्विटरद्वारे उठवलेल्या आवाजाला धर्माभिमानी हिंदूंचा मोठा पाठिंबा !
-
ट्विटरवर काही काळ #BoycottRedLabel हा ट्रेंड अग्रस्थानी !
हिंदुस्थान युनिलिवरकडून सातत्याने हिंदूंना धर्मनिरपेक्षेतेचे डोस पाजण्याचा प्रयत्न केला जाणे, हे संतापजनक आहे ! वास्तविक हिंदू हे धर्मांध असते, तर भारतात अन्य पंथीयांचे अस्तित्व टिकून राहिले असते का ? विज्ञापनांद्वारे सातत्याने हिंदूंना हीन लेखणार्या अशा आस्थापनांना त्यांची जागा दाखवण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन अपरिहार्य !
मुंबई : हिंदुस्थान युनिलिवर या ब्रिटीश आस्थापनाचे उत्पादन असलेल्या रेड लेबल चहाचे एक विज्ञापन प्रसारित झाले आहे. यामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हिंदु ग्राहक आणि मुसलमान मूर्तीकार विक्रेता यांचे संभाषण दाखवण्यात आले आहे. मूर्तीकार मुसलमान असल्याचे समजल्यावर हिंदु ग्राहक मूर्ती विकत घेण्याचे टाळतो. हे मुसलमान मूर्तीकाराच्या लक्षात येते. त्या वेळी तो हिंदु व्यक्तीला चहा पिण्यास देतो. मी अल्लाची पूजा म्हणूनच मूर्ती बनवतो, असे तो हिंदूला सांगतो. त्या वेळी हिंदु ग्राहकाचे विचार पालटतात आणि तो मूर्ती विकत घेण्याचे मान्य करतो, असे यात दाखवण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन या विज्ञापनाच्या विरोधात आवाज उठवला आहे. समितीच्या वतीने १ सप्टेंबर या दिवशी #BoycottRedLabel हा ट्रेंड (ट्विटरवरील या सुविधेमुळे एखादा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जातो आणि त्याविषयी लोक त्यांची मते मांडतात.) करण्यात आला. याला हिंदुत्वनिष्ठांनी पाठिंबा दिला. ट्रेंड चालू झाल्यावर काही वेळातच तो अग्रस्थानी आला आणि बराच वेळ अग्रस्थानी कायम होता. तसेच दुपारी २ वाजेपर्यंत हा ट्रेंड द्वितीय स्थानी कायम होता.
१. या ट्रेंडमध्ये अनेक धर्मप्रेमी हिंदूंनी सहभाग घेतला. तसेच ट्वीट करून रेड लेबलला हे विज्ञापन त्वरित काढून टाकण्याची हिंदूंनी मागणी केली आहे. या ट्रेंडचा रीच (विषय) कोट्यवधी लोकांपर्यंत पोचला.
२. या ट्रेंडची नोंद घेत अन्य प्रसारमाध्यमांनी याची बातमी प्रसिद्ध केली. यात नवभारत टाइम्स, इंडिया डॉट कॉम, वेबदुनिया, हरिभूमि, याहू न्यूज या वृत्त संकेतस्थळांचा समावेश आहे.
३. यापूर्वी होळीच्या निमित्ताने हिंदुस्थान युनिलिवरने त्याच्या सर्फ एक्सेल उत्पादनाच्या विज्ञापनाच्या माध्यमातून हिंदूंना धर्मनिरपेक्षता शिकवण्याचा प्रयत्न केला गेला होता.